शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

कॉँगे्रस-राष्ट्रवादी आघाडीतून सरकारला सळो की पळो करू : पृथ्वीराज चव्हाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2018 23:52 IST

२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला देशातील केवळ ३१ टक्के लोकांनी स्वीकारले. उर्वरित ६९ टक्के मतांचे विभाजन झाल्याने नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले. आपल्यातील मतविभाजन टाळले असते,

ठळक मुद्देवडगाव हवेलीत विश्वजित कदम यांचा सत्कार

वडगाव हवेली : २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला देशातील केवळ ३१ टक्के लोकांनी स्वीकारले. उर्वरित ६९ टक्के मतांचे विभाजन झाल्याने नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले. आपल्यातील मतविभाजन टाळले असते, तर भाजपला सत्ता अशक्य होती. काँगे्रस विचाराचे सर्वजण एकत्र आलो तर केंद्र व राज्यातील सरकारला सळो की पळो करू, असे प्रतिपादन माजी मुख्यमंत्री आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी केले.

वडगाव हवेली, ता. कऱ्हाड येथे आमदार विश्वजित कदम यांची विधानसभेवर बिनविरोध आमदार म्हणून निवड झाल्याबद्दल त्यांचा नागरी सत्कार व गावातील विविध विकासकामांचे भूमिपूजन तसेच उद्घाटन असा संयुक्त कार्यक्रम नुकताच पार पडला. याप्रसंगी ते बोलत होते.कऱ्हाड उत्तरचे आमदार बाळासाहेब पाटील, जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आमदार आनंदराव पाटील, आमदार जयकुमार गोरे, आमदार डॉ. विश्वजित कदम, भारती विद्यापीठाचे उपाध्यक्ष डॉ. इंद्र्रजित मोहिते, अजितराव पाटील-चिखलीकर, सुनील पाटील, कºहाडचे नगरसेवक इंद्रजित गुजर, शिवराज मोरे, राजेंद्र्र चव्हाण, मनोहर शिंदे, पैलवान नानासाहेब पाटील, अ‍ॅड. नरेंद्र नांगरे-पाटील, शिवाजीराव मोहिते, नितीन थोरात, प्रतापराव देशमुख, संयोजक व जिल्हा परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते जयवंतराव जगताप, येरवळेचे सरपंच सुभाषराव पाटील, दुर्गेश मोहिते, उमेश साळुंखे आदींची उपस्थिती होती.आमदार विश्वजित कदम म्हणाले, ‘पतंगराव कदम यांनी ४५ वर्षे केलेल्या सेवेची पुण्याई मला बिनविरोध होण्यामध्ये कामी आली. महाराष्ट्राचे संरक्षण व शेतकऱ्यांचे शोषण थांबविण्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीला राज्यातील जनतेच्या हितासाठी एकत्र येणे गरजेचे आहे.’

यावेळी आमदार आनंदराव पाटील, आमदार बाळासाहेब पाटील, डॉ. इंद्र्रजित मोहिते, अजितराव पाटील, डॉ. सुधीर जगताप यांनी मनोगते व्यक्त केली. शंकर जगताप यांनी स्वागत केले. जयवंतराव जगताप यांनी प्रास्ताविक केले. विजय माने यांनी सूत्रसंचालन केले.मोदी सरकारकडून योजनांचे बारसे : जयकुमार गोरेकार्यक्रमप्रसंगी जयकुमार गोरे म्हणाले, ‘गेल्या तीन वर्षांत मोदी सरकारने काँग्रेसने राबवलेल्या योजनांचे बारसे घालून जुन्या योजनांची केवळ नावे बदलण्याचे काम केले. आघाडी सरकारच्या काळातील गॅसचा दर भाजप सरकारने दुप्पट केला. शेतकºयांचे तर यांनी बेहाल केले आहेत. त्यामुळे हे जुलमी सरकार घालवण्यासाठी सर्वांनी एकत्र आले पाहिजे.एकाच व्यासपीठावर पाच आमदारवडगाव हवेली येथे आमदार विश्वजित कदम सत्कार कार्यक्रम नुकताच पार पडला. यावेळी या कार्यक्रमास पाच आमदार एकाच व्यासपीठावर पाहायला मिळाले. आमदार पृथ्वीराज चव्हाण, आमदार जयकुमार गोरे, आमदार बाळासाहेब पाटील, आमदार आनंदराव पाटील यांच्या एकत्रित आल्यामुळे नागरिकांच्यात हा चर्चेचा विषय ठरला.

टॅग्स :SangliसांगलीSatara areaसातारा परिसर